हातात तुझ्या हात माझा...
हातात तुझ्या हात माझा...
मंद प्रकाश चंद्राचा अन्
किती सुरेख ती सांजवेळ होती
हातात तुझ्या हात माझा
श्वासांचे तुझ्या श्वास माझे सोबती...
वाटले विसावे क्षणभर तुझ्या मिठीत
डावलून या सार्या बाह्य जगाची भीती
असुनही जवळ होते आपल्यात अंतर
अडसर आपला होती या जगाची रिती...
तुझ्या कोमल हातांचा स्पर्श
क्षणात आयुष्यभराचे सुख देत होता
वाटले कधी न सोडावा हात तुझा
जो नकळतपणे मी हाती धरला होता...
अजुनही तुझ्या हातांचा स्पर्श
सखे हातास माझ्या तो आहे जाणवतो
होतो का ग तुलाही त्रास असाच
जो आठवणीत तुझ्या या क्षणी मला होतो...
झाले बघ अधीर मन माझे
गुंतण्या तुझ्या त्या गरम श्वासात
येऊन माझ्या स्वप्नी घे ना मिठीत
नको उगाच असे जगणे तुझ्या भासात...

