हात तुझा
हात तुझा
अनमोल जीवनात
साथ तुझी हवी आहे
सोबतीला अखेर पर्यन्त
हात तुझा हवा आहे
आली गेली कितीही संकटे
तरीही न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे
आयुष्याच्या गोंधळात
फक्त हात तुझा हवा आहे.
कोणी काहीही म्हणू दे
तुझ्या शिवाय वेळ घालवायचा नाही
आणि तुझ्या आठवणीशिवाय
क्षणाला ही वेळ द्यायचा नाही
हात तुझा असताना हातात
मला चिंता कशाची ही वाटत नाही
मृत्यू जरी आला तरी त्याला सांगेन
मला आत्ता वेळ नाही

