STORYMIRROR

Sunita Anabhule

Tragedy

4  

Sunita Anabhule

Tragedy

हास्य कविता -- व्यथा प्रेमाची

हास्य कविता -- व्यथा प्रेमाची

1 min
791

तिच्या माझ्या प्रेमाची काय सांगू कथा!

अबोध, हळव्या, अल्लड प्रेमाची होती ती व्यथा!

शालेय जीवनातील माझी कविता ती होती,

मधुबाला सारखी सौंदर्याची मलिका ती होती!


राजस, सुकुमार मुखकमलाची ती राणी होती,

कर्णमधुर सुस्वर अशी तिची वाणी होती!

मी प्रेमसागरात डुंबत होतो,

तिच्या स्वप्नरंजनात गुंगत होतो!


प्रेमाला माझ्या येत होती भरती,

तिला मात्र याची खबर नव्हती!

या एकतर्फी प्रेमाचा तिच्या बापाला लागला सुगावा,

त्याने हळूहळू माझा घेतला मागोवा!


वाटलं हळूहळू उमलेलं एक- एक पाकळी,

पण फुलण्याआधीच खुडली माझ्या प्रेमाची कळी!

तिच्या बापाने खुबीनं तिची शाळाच बदलली,

माझी मधुबाला माझ्यापासून दूरच गेली!


आताच्यासारखी त्यावेळची परिस्थिती नव्हती,

निस्वार्थ प्रेमाची तेव्हा चलती होती!

त्याकाळी तू कोणाचीही हो पण सुखी हो, 

आणि आता, 

 तू माझी नाहीस तर

कोणाचीच नाहीस ही भावना,

उमलण्या आधीच कुस्करून गेली माझ्या प्रेमाची कथा!

अबोध, हळव्या, अल्लड प्रेमाची होती ती व्यथा!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy