हारवायंचंय कोरोनाला " पुष
हारवायंचंय कोरोनाला " पुष
स्वतःच घ्या स्वतःची काळजी
जीव अनमोल आहे
काळ वाईट आहे बाबांनो
कोरोनाने जो तो बेहाल आहे...
कुणाला काय विचारावी खुशाली
सारेच परेशान, चिंतातूर आहेत,
सारं कसं बंद झालंय
स्मशानात प्रेताचे धूर आहेत.
बघाय, भेटायला, सांत्वनासाठी
जायचं ही नाही राहिलं हातात
ज्याचं पोटच आहे हातावर
त्यांना विचारावं कसं ते काय खातात ?
अवघड झालंय सारं
जगणं आणि मरणं ही
कोण रचावेत कुणाचे
या अवघड काळात सरणं ही.
कुणाचाच नाही भरोसा
जपावं खरंच ह्या जीवाला
माणुसकीला जपावं साऱ्यांनी
जपावं भावानं च भावाला.
कसं व्हायचं कुणाचं
प्रश्न पडलाय प्रत्येकाला,
काळजी घ्या, नियम पाळा
हारवायचंय ह्या कोरोनाला.
