हार तू मानू नको
हार तू मानू नको


अथांग पसरलेल्या सागराला, तू घाबरू नको
जिद्द जिंकण्याची बाळग नेहमी, हार तू मानू नको
ध्येयाकडे कष्टाचे एक पाऊल, सातत्याने टाक
अपयशाच्या पायऱ्या चढताना, हार तू मानू नको
प्रयत्नांच्या उंच हिमशिखराला, तू घाबरू नको
ध्येय ठेव डोळ्यासमोर नेहमी, हार तू मानू नको
बळ एकवटून एक पाऊल, सातत्याने टाक
कधी उतारावर घसरताना, हार तू मानू नको
प्रेरणाहीन कराया आले जर, तू घाबरू नको
आत्मविश्वास बाळग नेहमी, हार तू मानू नको
मोह सोडून एक एक पाऊल, सातत्याने टाक
आवड निवड त्याग करताना, हार तू मानू नको
ध्येयप्राप्ती होईल विश्वास ठेव, तू घाबरू नको
ध्येयवेडेपणा बाळग नेहमी, हार तू मानू नको
कठीण वाटेवर एक पाऊल, सातत्याने टाक
ध्येय सोडून द्यावे वाटताना, हार तू मानू नको