STORYMIRROR

SAMRUDDHI LANGADE

Romance

3  

SAMRUDDHI LANGADE

Romance

तुटलेल्या उन्मत्त धाग्यांना

तुटलेल्या उन्मत्त धाग्यांना

1 min
11.5K

तुटलेल्या उन्मत्त धाग्यांना 

उगा जोडण्याच्या अट्टाहास 

घडून गेलेल्या क्षणांचा का 

स्वप्नवत वाटतो हा भास 


आजही गंध दरवळतो 

वहीत गुलाब पाकळ्यांचा 

उत्साहाने पावले धरती 

रस्ता आपल्या रानमळ्यांचा 


वास्तवाच्या ठिणग्या उडती 

घाव या काळजावर पडे 

विखुरलेल्या क्षणांना आता 

गोळा करणे भाग पडे 


साठवत आठवणी आता 

हट्टी हृदय गहिवरले 

वास्तवात परतताना या 

डोळे नकळत पाणावले 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance