STORYMIRROR

SAMRUDDHI LANGADE

Others

3  

SAMRUDDHI LANGADE

Others

एक किनारा असावा

एक किनारा असावा

1 min
12K

आयुष्यात एक किनारा हवा, परतीची ओढ लावणारा 

विसाव्याचे ठिकाण बनून शीण आणि थकवा घालवणारा 


आयुष्यात एक किनारा हवा, मनाची कवाडे उघडणारा मनात साचलेल्या अडगळीला अलगदपणे रितं करणारा


आयुष्यात एक किनारा हवा, स्व अस्तित्वाने आधार देणारा 

थकून गेलेल्या त्या जहाजाला पुन्हा नव्याने उभं करणारा 


आयुष्यात एक किनारा हवा, नव्या वाटेस पुन्हा धाडणारा  

शोधल्या नव्या वाटा तरी स्वतःकडे पुन्हा वळवून घेणारा 


आयुष्यात एक किनारा हवा, मनाच्या कोपऱ्यात दडणारा

पानगळ सोसलेल्या आयुष्यात वसंत पुन्हा बहरणारा


Rate this content
Log in