एक रात्र अशीही
एक रात्र अशीही


एकविसाव्या शतकात अंधारलेली
एक अशीही रात्र अनुभवली
आनंदाच्या उंबऱ्यात उभारुनी
ओशाळलेली दुःखी रात्र अनुभवली
अंधारलेल्या ह्या रात्री साथ हवी होती
स्वकीयांनी आज पाठ फिरवली
जणू ती एकाकीच पडली अन
ओशाळलेली दुःखी रात्र अनुभवली
तिला कोणाची जणू नजरच लागली
वैधाव्याने नशिबी ठाण मांडली
समाजाचे चटके आले पदरी
ओशाळलेली दुःखी रात्र अनुभवली
सावरले तिने स्वतःला नव्या जिद्दीने
ठामपणे संकटाला ती भिडली
अंगी हिम्मत बाळगली तरीही
ओशाळलेली दुःखी रात्र अनुभवली
मानला आदर्श लेकरांनी तिचा अन
तिच्यात आता बाप शोधू लागले
समाजबंधने स्वीकारत तिने
ओशाळलेली दुःखी रात्र अनुभवली