STORYMIRROR

SAMRUDDHI LANGADE

Romance

3  

SAMRUDDHI LANGADE

Romance

तू पाठवलेला पाऊस

तू पाठवलेला पाऊस

1 min
11.5K

तू पाठवलेला पाऊस 

तुझा निरोप घेऊन आला 

अल्लड त्या सरींनी मग 

तुझ्या आठवणींचा मेळ घातला 

गरजणाऱ्या त्या मेघांमधुन 

तुझी साद ऐकू आली 

सरींसंगे मग त्याने 

नवीन ताल रचली 

ओघळणाऱ्या थेंबांसवे 

अश्रुंनीही वाट मोकळी केली 

मातीच्या सुगंधात मग 

तू दिलेली चाफेकळी स्मरली 

स्मितहस्य चेहर्यावरील 

दिसेल का रे तुला?

अंतरीच्या भावनेची साद 

ऐकू येईल का रे तुला?

मनसोक्त त्या पावसात 

बेधुंद नाचल्या सरी 

तोड़ूनी बंध सारे धावशील 

अन् नजरेसमोर तू, हीच आस उरी  

पाठवल्या प्रीतलहरी पावसासवे 

हरखून नको जाऊस 

मनाच्या गाभाऱ्यात साठला 

तू पाठवलेला पाऊस          


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance