रोज रात्री ताऱ्यांच्या जगात
रोज रात्री ताऱ्यांच्या जगात


रोज रात्री ताऱ्यांच्या जगात
पुन्हा नव्याने गुंतून जाते
तुझ्या आठवणी स्मरताना
का नकळत गुंतून जाते
अलवार वाऱ्याची झुळूक
जणू तुझीच साद वाटते
रातराणीच्या गंधात उगा
का नकळत गुंतून जाते
उमललेल्या या भावनेला
लाजेची त्या सोबत लाभते
एकत्र व्यतित क्षणांत पुन्हा
का नकळत गुंतून जाते
ताऱ्यांच्या सुरेख छताखाली
मन तुझ्यासवे विसावते
नाते आता घट्ट विणताना
का नकळत गुंतून जाते