STORYMIRROR

Shital Yadav

Romance

3  

Shital Yadav

Romance

हृदयसंवेदना

हृदयसंवेदना

1 min
28.6K


हृदयशून्य या दुनियेशी कितपत झगडावे

जिथे माणसांनीच माणुसकीला सोडावे


मुक्या जीवांनाही असतात हृदयसंवेदना

व्यक्त होत नसले तरी समजती भावना


जवळ करीता अतोनात माया लावती

लावूनी लळा मानवापरी जीव ओवाळती


का रे मानवा पशुसमान असा तू वागतोस?

पशुलाही लाजवेल अशी कृत्ये करतोस


उघड डोळे,बघ या अबोल प्राण्यांची माया

कत्तल करुनी का विकतोस तू त्यांची काया


ओलांडून सीमा क्रुरतेची नष्ट करी जीवांचा

अंत तुझाही होईलच हिशोब ठेव कर्मांचा


विसरु नकोस करावे तसेच भरावे लागते

केलेल्या कर्मांचे फळ इथेच भोगावे लागते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance