आणि तुझा चेहराच तुझे प्रेम दाखवितो.
आणि तुझा चेहराच तुझे प्रेम दाखवितो.
पहाटेच प्रकाश अंधारास हरवतो,
नभांमागोमाग त्या सुर्याचा उदय होतो,
त्याच प्रकाशात दवबिंदू चकाकतो,
आणि ते दाट धुके तुझे प्रेम दाखवितो.
घराचा दरवाजा मी सकाळी उघडतो,
थंड वारा त्वचेवरती शहारे उभे करतो,
तुझ्या हाताचा चहा थंडीच मिटवतो,
त्या चहाची चव तुझे प्रेम दाखवितो.
खिडकीपाशी एका पुतळ्यासारखे उभा राहतो,
त्या पक्ष्यांचे किलबिलाट ऐकत बसतो,
तुझ्या सुरांमध्ये मी माझे सुर मिसळतो,
आणि तुझा आवाजाच तुझे प्रेम दाखवितो.
भाजी खरेदीसाठी बाजारात तुझ्यासोबत येतो,
भाजीकडे लक्ष न देतां फुलांकडे देतो,
तुझ्या केसांमध्ये हळुच गजरा अडकवतो,
त्यातील सुगंधच तुझे प्रेम मला दाखवितो.
सायंकाळी बागेत तुझा हात धरतो,
गुलाबापेक्षा जास्त गुलाबी तुझा चेहरा दिसतो,
तुला पाहायला दर्पणही स्वत:ला लाजतो,
तुझे सौंदर्याचं तुझे प्रेम मला दाखवितो.
तुला दिवसभर पाहतो व पाहतच बसतो,
तुझ्यावरतीच अनेक कविता रचतो,
माझे शब्द तुझ्या चेहऱ्यावरची चकाकी आणतो,
आणि तुझा चेहराच तुझे प्रेम दाखवितो.

