कशाला ?
कशाला ?
मोडायचा होता डाव तर
आधी खेळलीस कशाला ?
अबोल व्हायचे होते तर
आधी बोललीस कशाला ?
शब्दांना अर्थ नव्हता तर
कविता रचलीस कशाला ?
नंतर रडवायचे होते तर
आधी हसवलंस कशाला ?
मनावर आघातच करायचा होता तर
जखमांची काळजी घेतलीस कशाला ?
स्वप्न होते तर
सत्य भासवायचा प्रयत्न केलास कशाला ?
जर गमवायचेच होते मला तर
जीवनात माझ्या आलीस कशाला ?

