STORYMIRROR

Shital Yadav

Romance

3  

Shital Yadav

Romance

क्षितिजापलीकडचे प्रेम

क्षितिजापलीकडचे प्रेम

1 min
27.2K


दाटलेल्या कल्पित, लाघवी बांधाची

भावभावनांची अशी सोनेरी दुनिया

क्षितिजापलीकडचे प्रेम तुझे आगळे

अपूर्व आसक्तीची मोहक किमया


तुलाच शोधते वेडे मन साद ऐकून

मंजूळ बासरी तुझी मी भान हरपून

अथांग सागराच्या चंचल लहरी

बघ या नयनात लागल्या झरपून


आर्त हाक ही अबोल मनाची

सावळ्या तुला का समजेना

औदुंबर ठरला साक्षी प्रेमाचा

नामस्मरण मात्र उजळे जीवना


अधीरता वाढली भेटण्याची

जीव असा गुंतला तुझ्यात

प्रेम अमर राहील युगानुयुगे

भेद नसेल तुझ्या माझ्यात


सावळ्याची सावली राधिका

अर्पिते जीवन प्रांजळ प्रेमासाठी

क्षितिजापल्याड प्रेमळ विश्वातच

जुळतात जन्मोजन्मीच्या गाठी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance