आणि आज पुन्हा मी तुला पाहिले.
आणि आज पुन्हा मी तुला पाहिले.
ईवलेसे तारे आभाळामागे लपले,
सर्व ग्रह आपापल्या घरी गेले,
काय माहिती आज वाटच भरकटले,
आणि आज पुन्हा मी तुला पाहिले.
सायंकाळी पक्षी घरच्यांचे परतले,
दरवेळी प्रमाने सुर्य पर्वतात उतरले,
बंद असलेली ती खिडकी आज उघडले,
आणि आज पुन्हा मी तुला पाहिले.
सुर्यास्ताने नभांनी सोनेरी रंग धारण केले,
निर्सगाने जमीनीवर हिरवळ पसरविले,
दोघांच्या मिलनाने तुझे सोदर्यं वाढले,
आणि आज पुन्हा मी तुला पाहिले.
पहाटे थंड वाऱ्याने प्रवास प्रारंभ केले,
दवबिंदूनी गवताच्या पात्यावर राज्य केले,
तुझ्या कानामध्ये मोत्यासारखे ते चमकले,
आणि आज पुन्हा मी तुला पाहिले.
दुपारी सुर्यांची प्रखर किरणे धरतीवर आले,
वासरांनी झाडांच्या सावलीत वास केले,
अचानकपणे सुर्यांला चंद्राचे दर्शन झाले,
आणि आज पुन्हा मी तुला पाहिले.
चंद्राने काळोख्या आभाळावरती प्रेम केले,
पाऊसाचे इंद्रधनु मध्ये रुपांतर झाले,
त्यांचे संगम पाहुनी माझे डोळे भरुन आले,
आणि आज पुन्हा मी तुला पाहिले.
आज पुन्हा एकदा मी तुला पाहिले,
जवळूनच मंद वाऱ्याची झुळुक वाहिले,
सर्व प्रश्नांची उत्तरेच तेव्हा हरवले,
अन् माझ्या प्रेमाला पुर्ण विराम मिळाले.

