STORYMIRROR

SANJAY SALVI

Classics

2  

SANJAY SALVI

Classics

हाक विठ्ठलाची ….

हाक विठ्ठलाची ….

1 min
620


अशी कशी गोऱ्या तुरे, कशी शिक्षा मला दिली,

युगे अठठावीस उभा, मी एका विटेवरी,

काळ सरता सरेना, हात बांधून कटीवरी,

मला ठेवून विटेवरी, तू गेलास पैलतीरी,


किती काळ कळ सोसू, माझी पाउले झिजली,

तुझी शाबूत आहे वीट, माझ्या दोन्ही पायांखाली,

या बडव्यांनी रे माझा, पुरा बाजार मांडला,

भोळ्या भक्तांचे  दर्शन, घेता येत नाही मला,


लांब लांबून लोक येती, डोल भरून पाहती,

एक एक डोळा सांगे, तूच आहेस सांगाती,

तुक्या तू तरी आता, माझे पुष्पक पाठव,

तुम्हा सर्वांचीच आता, मला येते रे आठव.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics