हाहा:कारी पाऊस
हाहा:कारी पाऊस
पावसाळा, संपुनही,
जरी, हिवाळा लागला !
तरी, पाऊस थांबेना,
जीव, खुंटीला टांगला !!1
सततच्या, पावसाने,
उभी पिके ही सडली!
मनी, उत्पन्नाची आशा,
स्वप्ने ती उध्वस्थ झाली !!2
विध्वंसक, पावसाने
सारी सुगी भिजवली!
काही , उपाय सुचेना,
अश्रु,बळीची थिजली!!3
पौर्णिमेचा, चंद्र बघा,
ढगांआड तो लपला!
कोजागिरी, उत्सवाचा,
यंदा, आनंद संपला!!4
दिपावली, उदासीन,
मजा, फटाक्यांची गेली!
झाली, उदास बालके,
खिन्न, मनांने बसली !!5
इथे, आभाळ फाटलं,
बळीवर, कोप झाला!
देवा, या अति वृष्टीचे,
गांवे, गाऱ्हाणे कुणाला!!6
रस्त्यावरी, पाणी वाही,
घरदारे, ती बुडाली!
अन्नाविणा, ती उपाशी,
मुलेबाळे, घाबरली !!7
कृध्द, वरूण देवाने,
इथे, थैमान घातले !
हाहा:कार , पावसाचा,
होता, दैवच रूसले !!8
नियतीचे, दुष्टचक्र,
कुठे, टेकवावा माथा!
घास , तोंडचा तो गेला,
बळी , व्यक्त करी व्यथा !!9
