हा देश महान
हा देश महान


हे मातृभुमी तुला,तुला हे वंदन
मी गातो गित तुझे,तुझेच गुणगाण....।।
कित्येक जन्मा आले,शुर वीर तुझ्यापोटी
अर्पिले त्यानी प्राण,प्राणही तुझ्यासाठी
अर्पिले सर्वस्वच,तन,मन,धन...।।
वीर लढले शौर्याने,पर्वा न जिवाची करता
नाही मरणाला ते भिले,ते सुपूत्र तुझ्याकरता
चढले ते फासावर,दिले बलिदान...।।
त्यांनी त्यागिला संसार,भोगला तुरुंगवास
गोळ्या झेलल्या छातिवर,नाही भिले मरणास
त्या दिले हुतात्म्यांनी,दिले त्यांचे ते प्राण... ।।
विसरुन सारे भेद,आम्ही सारेच एक होऊ
नांदू सारे सुखाने,जनू सारेच भाऊ भाऊ
ऐक्याचा मंत्र देऊनी,वाढवू जगात शान...।।
आम्हा प्रेरणा विरांची, ती देशभक्ती मोठी
जगणे मरणे आमचे,हे आहे तुझ्यासाठी
आम्ही गाऊ एकमुखाने,हा देश माझा महान...।।