हा देश माझा 🇮🇳
हा देश माझा 🇮🇳
डोळे उघडे ठेव, वेळ गलिमाची,
विकृत मनोवृत्तीला आळा घालायची.
ही धरती देण आहे स्वतंत्र विरांची.
हिथे धर्म नाही मोठा,जात नाही मोठी,
जिवापाड प्रिय मज भारत संस्कृती.
सार्वभौमत्व, स्वामित्व निरंतर
शोभून दिसे एक मन, एक घर
ही जात ती जात दूर करी तू अंतर.
हा देश माझा जगा वेगळा,
रंगाने, ढगाणे आगळा वेगळा
लिखाणातून घडेल बदल,ही वेळ गलिमाची,
सरणावर झोपण्याआधी ओढली असेल मी,
मखमली ही वर्दी तुझ्या तिरंग्याची.
हा देश माझा जगा वेगळा,
रंगाने, ढगाणे आगळा वेगळा,
