हा देश माझा....
हा देश माझा....
हा देश माझा
माेठी लाेकशाही,
धार्मिक विविधता
एकसंघ राही....
हा देश माझा
एकात्मता जपतो,
विविध क्षेत्रात प्रगती
महासत्ता दिशेने जाताे...
हा देश माझा
समस्यांनी वेढलेला,
स्वकीयांशी लढणं
घाेटाळ्यांनी गांजलेला...
हा देश माझा
तिरंगा डाैलाने फडकताे,
शांतता, सामर्थ्य, सुबत्ता
समाधान यात शाेधताे...