गवत
गवत
हिरवं नाजूक रेशीम गवताचं पातं माळरानावरती वार्यासोबत डौलदारपणे डुलत
दवबिंदूच्या ओघातून वरवर चढत
सूर्याच्या सोज्ज्वळ किरणांनी अन् पडलेल्या मायेच्या चार थेंबानी रुक्ष वातावरणात ही
कसं आनंदाने हसून हे जग बघतं
माळरानाची शोभा जणू वाढवतं
नाजूक रेखीव पाकळ्या हिरवी
नाजुक पाती दोन बाजुला
सळसळती नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती वाराहून रूप सानुले
खेळ खेळती झोपाळा
रात्रही इवली होऊनी गाते अंगाईचे गीत ह्याला
इवलासा जीव...का...न करावी कीव....
नसे खंत.... जरी अल्पायुषी
मिळे क्षण जो मानतो त्यात खुशी
नेहमीच हसत मुखाने गातो आनंद तराने
नेत्रसुख देतात तुझे ते पान वारा संगे डोलणारे 🌿
खरंच देखणं रूप तुझं पाहील तर मनास देत चैतन्य
जगण्यास नवी उभारी
तुझ्या परी रुक्ष वातावरणातही आनंदाने बहरून
गात रहावी रे सुख दुःखातही
जीवनात आनंदाची गाणी 🙏😊
