STORYMIRROR

Suresh Kulkarni

Inspirational

4  

Suresh Kulkarni

Inspirational

गुरुराया

गुरुराया

1 min
251

विविध रुपे घेऊनी येशी

गुरु राया तू नित्य

आळविता तुला

माझे मन होई शांत


श्रीपाद श्रीवल्लभ

उभा ठाके श्रीदत्त

नृसिंहसरस्वती कधी 

स्वामी समर्थ सुश्रुत


गिणगीण गिणात दिसे

गजानन साक्षात

साईरामशाम कधी 

श्रद्धा शांती सबुरी देत


शंकर महाराज कधी

दिव्य अवतार घेत

होता कधी मतीभ्रम

पाजसी तू ज्ञानामृत


कृष्णविष्णु विश्वरुप

मावसी ना गगनात 

 ध्यावू किती आठवू किती

रुपे तुझी छान छान


गोड तुझे नाम घेता

मिळे शांती समाधान

आळविता तुला

माझे मन होई शांत



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational