STORYMIRROR

sarika k Aiwale

Classics Others

4  

sarika k Aiwale

Classics Others

गुरु ज्ञानाचा सागर

गुरु ज्ञानाचा सागर

1 min
326

आई दैवत पाहिले असे विश्वाचे आगर

हर प्रश्नाचे उत्तर गुरु ज्ञानाचा सागर


आज पौर्णिमा दिवशीअनुसया घेत भेटी

दिली दिव्यत्व प्रचिती जगी दत्त प्रकटति


अदिमाया दिव्य मोठी जन्म त्रिदेवांस देई

दत्तगुरु लाभे जगीत्रैलोक्यास शिकवती


गुरु ज्ञानाचा ग मेरु गुरू कृपेचा निर्धारू

सर्व सुखाचा महमेरु दर्शनासी मेळ धरु


जीवनात ति आव्हाने करी मार्ग तो सुकर

गुरु ठायी सर्व पाही क्षणी पळे ते संकर


येता प्राण हा कंठाशी माय हृदयाशी घेती

गुरु जाणं खरा तोचि वैर भाव दुरावति


गुरु विद्येचा मार्गरु गुरु विण विद्या नाही

विद्ये विण मति नाही मति विण जग नाही


गुरु ज्ञानाचा सागरज्ञान विश्वाचे सादर

जन्म मातिचा तो गोळा गुरु देतसे आकार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics