STORYMIRROR

Shital Yadav

Inspirational

4  

Shital Yadav

Inspirational

गुंतले श्वास

गुंतले श्वास

1 min
691


तुला रोज जरी पाहिले

हृदय स्पंदने तरी वाढती

होता दृष्टिआड रूप गोजिरे

मनी विचारांचे ढग दाटती


मिटता या पाकळ्या नेत्रांच्या

घूमतो कानात बासरीचा स्वर

देह होऊन राधिका कृष्णासंगे

करीती रासगरबा जणू धरेवर


नश्वर हे जगणे भक्तीविना

गोडी लागली कृष्ण नामाची

जळी,स्थळी,काष्ठी,पाषाणी

दिसे छवी मज घनश्यामाची


वाहिले जीवन तुज कान्हा

नाम स्मरणात गुंतले श्वास

नाही आता चिंता कशाची

लाभला मज कृष्ण सहवास


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational