गुन्हा
गुन्हा
भ्रष्टाचाराचा डोंगर झालाय किती मोठा
कितीतरी होतो सामान्य नागरिकांना तोटा
काहीजण पकडले जातात घेताना लाच
घोटाळा करतात काही होत नाही गैरसमजुतीमुळे याच
मला त्यदिवशीच निलंबित केलं प्रशासनाने
माहित नव्हतं मोठी रासच तयार होते कणाकणाने
तुमच्या पापाचा एकदा भरल्यावर घडा
कुणीतरी देतो मग अन्यायाविरूद्ध लढा
प्रामाणिकपणा, विश्वास, कर्तव्य या गोष्टी माझ्यासाठी होत्या फाजील
वस्तुस्थितीची जाणीव झाल्यावर मन झालं खजील
तुरुंगात बसून केलेल्या गुन्ह्यापासून मुक्ती साधतो आहे
ज्यानं पहिली दिली लाच जबरदस्तीनं त्याच व्यक्तीला शोधतो आहे