STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Abstract Inspirational Others

3  

Dhananjay Deshmukh

Abstract Inspirational Others

गुलाबनेच प्रेम व्यक्त होत का..?

गुलाबनेच प्रेम व्यक्त होत का..?

1 min
235

काट्यांनीच घाव माझ्या घातले मनाला, 

रक्तबंबाळ पाकळ्यांनी या केले मनाला. 


गुलाबानेच कधी प्रेम व्यक्तं होतं का कुणाचं?

सांगितलेले शब्दात कुणाच्या पटले मनाला.


जपले कैक क्षण मनात आठवांचे आपल्या, 

स्वप्न तुझे ते सुखद अलवार बोचले मनाला.


नयनात फक्त पाणी आणि स्वप्न तुझे

अलगद या सांजेने कुरवाळले मनाला.


सागराचा तो किनारा बेभान वार्‍याचा, 

वादळ उध्वस्त करून ते या गेले मनाला.


अलगद फुंकर शब्दांची काव्यात माझ्या 

लेखणीने माझ्या या आज लिहिले मनाला. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract