गुलाब..!
गुलाब..!
काट्यास खंत मोठी
त्यास कोणी ना चुंबती
उगाच वेडे फकीर गुलाबाच्या
सौन्दर्यास पाहुनी झोंबती
म्हणे काटा त्या वेड्यांना
उद्या पाकळ्या गळतील तेंव्हा
उरे मीही तसाच वाळुनी
पण डंख शाबूत ठेवुनी
कळले मला बोलणे त्याचे
कळ बोचणीची लागता
विसरेन कसा मी आता
मी गुलाब स्पर्शिला होता....!

