गुढी उभारूया...
गुढी उभारूया...
गुढी उभारू या
नव चैतन्याची
आशेची हर्षाने
नव पालवीची...१
निसर्ग हा जणू
फुलून सजला
सोड मरगळ
साद दे मजला...२
भरजरी साडी
साखरेची गाठी
कलश शोभती
कडुलिंब काठी...३
कसरत करू
आरोग्य संभाळू
नियम पाळून
करोनास टाळू...४
आनंदाने सारे
गुढी उभारू या
मराठी मातीची
संस्कृती जपू या...५
