गरूड
गरूड
उंच डोंगराच्या कड्यावर पक्षीराज गरुड दिमाखात बसे
रंग फिकट तपकिरी त्याचा सोनेरी प्रकाश किरणात उठून दिसे
तीक्ष्ण नजर, मजबूत चोच नखे अणकुचीदार
सर्व पक्षांमध्ये गरूड असे सामर्थ्यवान
सदैव अंगी ठेवूनी आत्मविश्वास
वादळालाही आव्हान देतो थेट
बघत राहावा असा उडण्याचा त्याचा प्रचंड वेग
दूरदृष्टी ठेवून घेतो
उंच आकाशात झेप
जीवन प्रवासात येतील अनेक अडचणी धीराने तोंड द्याव त्याला प्रत्येक क्षणी
उंच भरारी घ्यायला पंख
असावे बळकट
आत्मविश्वासाने तू
प्रगतीचा मार्ग धर
आकाश सदैव खुले तुझ्यासाठी
कदाचित हाच गरुडाचा अनमोल
संदेश असेल आपल्यासाठी🙏😊
