STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

4  

दिपमाला अहिरे

Inspirational

गृहिणी

गृहिणी

1 min
377

पहाटेपासून तिच्या कामाची लगबग सुरू होते

ती गृहिणी असते.

थकवा असो की,आजारपण ती कधीच थांबत नसते

ती गृहिणी असते..

चहासोबत नाश्ता आणि तेव्हाच शाळेच्या बॅगाही भरते ती गृहिणी असते..

अंघोळीचे गरम पाणी सर्वांना ओतुन देते

टॉवेल,ब्रश सोबतच कपडे ही हातात ठेवते

ती गृहिणी असते..

मुलांचे मोजे, नवऱ्याचा हातरुमाल, जेवणाचे 

डबे भरुन जागेवर ठेवते 

ती गृहिणी असते..

मुलीची वेणी फणी करते कपड्यांची घडी घालते 

अस्ताव्यस्त फेकलेले ओले टॉवेल गॅलरीत सुकवते

ती गृहिणी असते..

प्रत्येकाचे आनंदाने करते ,

मोबदल्यात काहीही मागत नसते

ती गृहिणी असते...

घर, आंगण, पोरं सोरं सारे झगमग ठेवते

स्वतः मात्र विस्कटलेले केस

आणि कळकट मळकट कपड्यात दिवसभर राबत असते ती गृहिणी असते..

सुट्टी,बोनस, पगारवाढ कसलीही अपेक्षा तिला नसते

ती गृहिणी असते..

हुशार, चुणचुणीत, कर्तबगार ति ही नक्कीच असते

पण कुटुबांच्या सोयीसाठी कामावर जात नसते मुलांच्या भविष्यासाठी ती नौकरी सोडत असते

ती गृहिणी असते...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational