गृहिणी
गृहिणी
गृहदक्ष
ती गृहिणी
गृह सारे
तिचे ऋणी
उंबरठा
अंगणात
बोलते ती
रांगोळीत
घरीदारी
सारे कोणे
काढू नये
कोणी उणे
घर सारे
आवरते
सुंदर ती
सजवते
घरादारा
जोडणारी
नातेगोते
जपणारी
घरालाही
घरपण
एकत्र हो
सारेजण
आधार ती
प्रत्येकाचा
गृह सुख
संसाराचा
