गर्दी
गर्दी
काल माणसांच्या गर्दीत
माणसं वाचीत फिरत होतो
अचानक समोरून एक माणूस आला
काळा ठिक्कर चेहरा
रापलेलं अंग तसा तो
आडदांड आणि दणकट वाटत होता
शरीरावर त्यांनी यातनांचा नकाशा कोरला होता
प्रत्येक यातनांतून काही अस्पष्ट शब्द
जमीनीवर टपकत होते
त्यांना आवाज नव्हता
एवढं सगळं असूनही
त्याच्या पापण्यात एक जरब होती
आणि हातात रक्ताळलेला वर्तमान होता
देहबोलीत जबाबदारीचं भान होतं
गर्दीतला एक बनला होता
त्याच नात नव्हतं
समुद्राशी,आकाशाशी किंवा अन्य कुणाशी
त्याच नात होतं फक्त त्याच्याशी
त्याच्या इमानाशी......
गर्दीतल्या गर्दीशी ......
