STORYMIRROR

Surykant Kamble

Tragedy

3  

Surykant Kamble

Tragedy

गर्भपात

गर्भपात

1 min
197

मुलगा की मुलगी 

होणार म्हणून करत

होते गर्भपात

पण मासिक पाळीच्या दिवशी 

मंदिरात प्रवेश केला तर 

लागते यांना पाप 


असंख्य जीव पोटात मारून 

केले यांनी काय 

पैशासाठी डाॅक्टरने स्वतःलाच 

विकले की काय 

मुलगा झाला म्हणून वाटत

होते गावभर पेढे 

आता तोच मुलगा अनाथ 

अश्रमाची वाट दाखवून 

ठरवतो वेडे


मुलींची हत्या करून 

मुलाला बायको मिळेना

लग्नाला

मुलींची संख्या कमी करून 

काय साध्य करून दाखविले

जगाला

मुलगी झाली म्हणून हक्काने

सांगतो जगाला 

सुखात नाहीतर दुःखात दोन 

अश्रू गाळायला 


काय हा जमाना आला 

मुलगा नको आम्हाला 

मुलगी आमचं हेच सर्वस्व 

ओरडून सांगू लोकाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy