गोवा
गोवा
काय करावी वर्णन
गोवा राज्याची गाथा
प्रत्येकाने एकदा तरी
टेकवावा गोव्याला माथा।।
निळ्याशार सागरातले
शंख शिंपले तळी पहावे
लाटांचा मधूर आवाज
एकण्या सागरतिरी रहावे।।
बीचवरी सैर करतांना
होता वाळूचा पाया स्पर्श
सांगू शकत नाही शब्दात
किती होतसे मनी हर्ष।।
क्रुझ ची सैर तर एकदातरी
प्रत्येकाने न चुकता करावी
सागरातील ते अनमोल चित्रे
आपल्या नयनात भरावी।।
खाण्याचे पदार्थ आठवताच
सूटते तोंडाला लगेच पाणी
चटचटीत व लज्जतदार
पदार्थांची असतात सर्व खानी।।
