गोवा झाला कोरोनामय....
गोवा झाला कोरोनामय....


अभिमान वाटतो सांगतांना आमचा गोवा
निसर्ग समुद्र किनाऱ्यानी आहे नटलेला
माशाच्या खवय्यासाठी प्रसिद्ध असलेला
नेहमी सुशेगाद आणि आनंदित जगणारा
असा हा गोवा
मन भयभीत होते पाहताना की गोवा आता कोरोनामय झाला
देशाच्या इतर राज्याप्रमाणे हा कोरोना
काही दिवसामागे गोव्यात ही येऊन पोहोचलेला
७ जणांना लागण लावून तो स्थापित झालेला
७ जणांनी त्याचावर मात करून पळवून लावले त्याला
कोरोनमुक्त गोवा झालेला
पण महिनाभरात परत धडकला
तो जणू सूड घेण्यासाठी
आता तांडव चालू आहे त्याच चोहोबाजूनी
काही दिवसातच शतक ही गाठले त्याने
निषाप्प बळी ही घेतले
आनंदित अश्या गोव्याला
आपल्या जाळयात ओढले आणि कोरोनामय केले