गोपिनाथजी मुंडे
गोपिनाथजी मुंडे
मला आली आठवण, मुंडे साहेबांचे झाले स्मरण
गोपिनाथ गडाचे जतन, समाजाचे प्रेरणास्थान
गोपिनाथ मुंडे साहेब, होते दीन दुबळ्यांचे आशास्थान
शेतकरी, कामगार यांच्यासाठी होते जीवनप्राण
जाणीले हृदय गरीबांचे, जाणिले दु:ख अंतरीचे
ओळखले मन गरीबांचे, भले केले आयुष्याचे
पाहून गरीब रडताना, त्यांची गरीबी पाहताना
मदत पोहचविली त्यांनी, काम दिले दोन हातांना
देह झिजविला त्यांनी होवून आदर्श माणूस
आठवण त्यांची सर्वांस, वाहिले कार्य जनांस
माणूस माणूसकीने जोडला, देव माणसात पाहिला
घराघरात माणुसकीचा कळस त्यांनी हो गाठला
रक्तात त्यांच्या असे, संघर्षाचा खरा वारसा
शिकवण स्वाभिमानाची त्यानी दिली हो माणसा
लढा असे त्यांचा सत्याचा, खरे समाजकार्य करण्याचा
विडा उचलला त्यांनी खंबीर नेतृत्वाचा
निर्णय क्षमतेने होते दमदार, सोडविले त्यांनी प्रश्न गंभीर
उच्चविचार, संस्कृती, संस्कार होती त्यांच्या कुटुंबावर
त्यांच्या उत्तम वाणीने, भारदस्त आवाजाने
जिंकली सर्वांची मने, त्यांच्या उत्तम वाणीने
सुंदर भाषाशैली, त्यांच्या रक्तात भिनली
महाराष्ट्राचा अष्टपैलू वक्ता, शान राजकारणात राखली
गृहमंत्री पदापासून ग्राम विकास केंद्रीयमंत्री पद भुषवून
गाजविले त्यानी राजकारण, थोर समाजकारण
एक सामान्य कार्यकर्ता झाला महाराष्ट्राची शान
मुंडे साहेब आठवण आहे भारताचा अभिमान
गोपिनाथ मुंडे साहेब, होती गर्जणारी तोफ
महाराष्ट्राचा बुलंद आवाज, गोरगरीबांचे मायबाप
