STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

गोमाता नंदन

गोमाता नंदन

1 min
350

कृषीवल मित्र सखा

बैल गोमाता नंदन

निरागस बालकाचे

मित्रा स्वीकारी वंदन


राब राबतो शेतात

किती देह झिजवतो

तुझ्या कष्टावर आम्ही

अन्न धान्य पिकवतो


तुला तमा नाही कधी

थंडी, वादळ वाऱ्याची

सर्दी होत नाही कधी

झड लागे पावसाची


नाही रुसवा फुगवा

सदा कष्ट उपसतो

शेतकरी धन्यासाठी

नित्य इमान राखतो


येता उत्सव पोळ्याचा

तुला अंघोळ घालतो

कंठी घुंगुराच्या माळा

अंगी  झुली चढवतो


कामा विश्रांती देऊन

तुझी वरात काढतो

घास पुरणपोळीचा

तुला खावयाला देतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational