STORYMIRROR

UMA PATIL

Children Others

3  

UMA PATIL

Children Others

गोजिरवाणी....

गोजिरवाणी....

1 min
6.6K


गोंडस, नाजूक

लाडाची छकुली आमची

आवडती सर्वांची

लोभस..... ॥१॥


लाडात येते

परी तू इटुकली

चिटुकली, पिटुकली

गोजिरवाणी.... ॥२॥


आजच्या वाढदिवशी

घे तुला शुभेच्छा

एकच इच्छा

उंचावण्याची..... ॥३॥


आवडतात सदैव

बोलके तुझे हावभाव

स्वप्नांचे गाव

डोळ्यांमध्ये..... ॥४॥


आकाशी घ्यावीस

उंच तू भरारी

बाणा करारी

यशासाठी..... ॥५॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children