गोधडी
गोधडी


उरलेल्या कपड्यापासून
गोधडी आई शिवायची
वेगवेगळं कला कौसल्य
त्यात ती मस्त दाखवायची.
जुन्या तिच्या पातळाचे
थर ती त्यावर रचायची
दोन तीन थरा नंतर पुन्हा
एक नवीन थर अंथरायची.
उलटी सुलटी करून सुईने
मोठे धाग्याचे चोकट करायची
बारीक शिवणीच्या टाक्यांनी
सुंदर कला त्यात काढायची.
मुलापासून सगळ्यां नातवंडांना
शिवून दिल्या गोधड्या मायेच्या
आई नाही राहिली माझी आता
गोधड्या आहेत तिच्या उबेच्या.
आईची आठवण होते तेव्हा
मायेच्या पांघरुणात मी शिरते
गोधडीच्या वासाने आईचा हात
प्रेमळ फिरल्यागत मला वाटते.