STORYMIRROR

Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

गोधडी

गोधडी

1 min
210

उरलेल्या कपड्यापासून

गोधडी आई शिवायची 

वेगवेगळं कला कौशल्य 

त्यात ती मस्त दाखवायची.


जुन्या तिच्या पातळाचे

थर ती त्यावर रचायची

दोन तीन थरानंतर पुन्हा

एक नवीन थर अंथरायची.


उलटी सुलटी करून सुईने

मोठे धाग्याचे चौकट करायची

बारीक शिवणीच्या टाक्यांनी

सुंदर कला त्यात काढायची.


मुलापासून सगळ्यां नातवंडांना 

शिवून दिल्या गोधड्या मायेच्या

आई नाही राहिली माझी आता

गोधड्या आहेत तिच्या उबेच्या.


आईची आठवण होते तेव्हा

मायेच्या पांघरुणात मी शिरते

गोधडीच्या वासाने आईचा हात

प्रेमळ फिरल्यागत मला वाटते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational