गोड आठवण
गोड आठवण
कधी तरी तू मला बोलावशील का
माझा हाल काय तू विचारशील का
केव्हातरी भेटलो आपण आहे का आठवण
केली होती किती मस्करी ठेवली का साठवण
माझ्यासाठी कितीतरी वेळा तू भांडलीस का
कधीतरी तू मला बोलावशील का
वाचत वाचत तू माझेच गीत गायलेस
कोणालातरी तू मीच आहे म्हणालेस
तुझ्या मनातलं आता सांगशील का
कधीतरी तू मला बोलावशील का
खेळाचा तू पहिली पण नेहमी माझ्यासाठी मागे
अभ्यासात मी पण तुझ्याच मागे
कधी सरांना तू सांगशील का
कधीतरी तू मला बोलावशील का
एकदा तुझी वाट बघत बसलो
सांगून सुद्धा नेमकाच फसलो
आता तरी तू माझी आठवण करशील का
कधीतरी तू मला बोलशील का

