गणपती आराधना
गणपती आराधना
शुभ कार्या सुरुवात
वंदू चला गजानना
यश ते मिळे कार्यात
स्मरू पार्वतीनंदना.
आज गणेश जयंती
गणपती जन्मोत्सव
रम्य सोहळा मंदिरी
होई मोठा महोत्सव.
शिव पार्वती नंदन
गजानन गणपती
गजमुखी लंबोधर
मायबाप विद्यापती.
विघ्नेश्वर गजपती
सकलांचा सूखकर्ता
भक्त जना संकटांचा
तोच एक दुःख हर्ता.
मोदकांचा तो नैवेद्य
भारी प्रिय गणेशाला
आरतीने गुण गाऊ
आळवुया मोरयाला.
गणपती आराधना
करू चला लोक हिता
वाहू शब्दांची सुमने
शुभ कल्याणाकरिता.
