Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

AnjalI Butley

Abstract Others

3  

AnjalI Butley

Abstract Others

गंगेच्या काठावर

गंगेच्या काठावर

1 min
9


गंगेच्या काठावर गाव माझे उभे

दक्षिण वाहिनी म्हणून ओळख घेऊन

शास्त्रज्ञ शोध घेतांना थकले

लक्ष्मणकुंडावरून रामकुंडावर येतांना

कशी झाली तू गंगे, गोदे दक्षिण वाहिनी? 


रामकुंडावरती अरूणा-वरुणा-गोदेचा त्रिवेणी संगम

भक्त येतात देश विदेशावरून

तर्पण अस्थी विसर्जन विधी करण्यास

आहे येथे अनोखा कुंड

म्हणे तिथे अस्थी विसर्जना नंतर

अस्थी विरघळतात गोदेत...


पूर्व पश्चिम तटावर 

आहे एकसे एक मंदिरे

गोदेचे, शिवाचे, रामाचे, हनुमानाचे, गणपतीचे! 

बारा वर्षांनी उघडणारे गोदामातेचे मंदिर

भाव खाऊन जाते सिंहस्थात!


अनोखे नंदि नसलेले शीव मंदिर कपालेश्वर

दैवत आहे शिवभक्तांचे...

अर्धनारी नटेश्वर, बाणेश्वर, नारोशंकर

नाव किती घेऊ शिव मंदिरांचे! 

असतो अनोखा सोहळा प्रत्येक प्रदोषाला, शिवरात्रीला

पालखी निघते कपालेश्वर शिवाची, गंगेवर होते त्याचे मिलन पूजन! 


रामाचे मंदिरे अनेक

त्यात पहिला मान जातो काळारामाला 

नंतर गोरा राम, अहिल्याराम आणि इतर! 

आहे त्यांच्या अनोख्या प्रथा रामजन्मानंतरच्या

एकादशीला काळारामाचा असतो रथोत्सव! 


दुतोंड्या मारोती आहे उंच

गोदेला किती कधी पूर आला होता

ह्याचा साक्षी व नोंद, आहे त्यावर! 


गणपतींचे मंदिरे अनेक 

उजव्या डाव्या सोंडीचे विविध प्रकार! 


मंदिरांबरोबरच जिभेचे चोचले पुरवण्यास विविध अड्डे

मिसळपाव तर्री, गरम गरम जिलेबी, भेळभत्ता, नाशिकचा स्पेशल चिवडा.. 

खुरचंद वडी, गुलाबजाम, गोड दहीवडे, गोडी शेव, मलई पेढे, पक्के पेढे, मलाई मार के लस्सी

जिभेला सुटले पाणी नाव घेताच!! 

उन्हाळ्यात मिळते खास तिखट मिठ लावलेली काकडी, पेरू

करवंद, जांभळे, बोरं रानमेवा तो अनोखा

विकण्यास येतात आदिवासी कारी !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract