गंगा माता
गंगा माता
तुझ्या पवित्र पाण्याने मज पावित्र्य जणू लाभतं,
अन् पापातून मिळे मुक्ती असं लोक असत सांगत...
पावित्र्य रुपी मातेची साथ असावी अशीच सदा सर्वदा संगत,
आव्हान होतसे देवी-देवतांचे जेव्हा होते तुझ्या पवित्र जलाने पूजेची सांगता...
लाभले आम्हास गंगामातेचे वरदान असे की होई आमचा आत्मा तृप्त,
पवित्र जलअनुभूतीने होई जणू मस्तिष्कही शांत अन् होई आयुष्य अगदी निवांत...
अशा परी होई सर्व पापे नष्ट अन् मिळे मग पापमुक्ती,
विराजमान प्रथमतः जटांमध्ये शंभराच्या होऊन वाहतसे पृथ्वीवरी ही दिव्य शक्ती...
मग मिळते मनाला परम सुख-समाधान-शांती,
करावी जशी प्रभुची भक्ती जणू तशीच भांति...
समाधानी पावतात जशी वारकऱ्याची पावलं विठूरायाच्या मुखदर्शनाने,
तशीच भरून पावतात पावलं पवित्र गंगा जल अनूभुतीने...
दिवसागणिक वाढतो जसा विश्वास भक्ती मार्गाने,
तसा विश्वास दृढ होतो गंगा मातेच्या पवित्र दर्शनाने...
समीप येताच वेळ बाप्पाच्या निरोपाची येती जसे अश्रू दाटूनिया,
गंगा मातेच्या निरोपाप्रसंगी तसाच कंठ येई मग दाटूनिया ...
चाहूल नंतर पुन्हा-पुन्हा नयनरम्य, सुखप्रदानकायक अन् दिव्य-पावित्र्यरुपी गंगा जलअनूभुतीची,
अन् "मी" पणाला विसरोनी डुबकी घेवोनिया गंगा जलात पावित्र्यरुपी शून्यत्वात जाण्याची...
