STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Romance Fantasy

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Romance Fantasy

भास तुझ्या स्वप्नांचा

भास तुझ्या स्वप्नांचा

1 min
216

भास तुझ्या स्वप्नांचा हरघडी

होत राहो माझ्या या मनाला |

सुगंधी गार वाऱ्याचा स्पर्श जसा

सुखद हवासा वाटतो तनाला | |१| |


सारे काही मनासारखेच सदैव

नसते होत प्रत्यक्षात जरी |

स्वप्नरंजन हाच त्यावर एकमेव 

उपाय हमखास वरचेरवरी | |२| |


जपून ठेवते मनाच्या कुपीत मी

तुझ्या स्वप्नांचा तसाच भास |

नको तुला वारंवार व्हायला माझ्या

स्वप्नांत खरोखरच येण्याचा त्रास | |३| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract