शोध देवाचा : जणू "मी" ची जाणीव
शोध देवाचा : जणू "मी" ची जाणीव
या जगाचा पोशिंदा तू रे देवा, तुझी किमया जणू न्यारी,
तुझा न्याय निवाडाही आहे अगदी तुझ्यासारखाच, लयं भारी!
तुझा शोध घेता घेता मनू जणू रममाण होतो तुझ्या या जगात,
खरे पाहता, तुझ्या चरणी नतमस्तक होणे जणू 'मी' ची जाणीव आहे.
कधी, कुठे कितीही अंधार झाला असला तरीही रहावयाचे असते सतत धडपडत,
नौका जणू आहे मनू ही तुझी जीवनरुपी, अन् देवा तुझे नाम जणू सुंदर अन् सत्य अशी एक गोष्ट आहे.
