स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
1 min
188
स्वातंत्र्य, स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय असतं ?
आकाशात झेप घेणाऱ्या पक्ष्याचं जग असतं .....
झटले अनेक थोर, ते धन्य जाहले,
त्यांचे फळ आज फळासी आले।
ते थोर जर का झटले नसते,
तर काय हे स्वातंत्र्य मिळाले असते ?
स्वातंत्र्य, स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय असते ?
सर्व सुखा-दु:खा पलीकडचा मोकळा श्वास असतो ।
जाण स्वातंत्र्याची आणि ठेवला पाहिजे स्वातंत्र्याचा मान,
गांधी, नेहरू, टिळक, बोस यांनीच दिले देशासाठी बलिदान।
झाले बहु, होतील बहु, परी यासम हेच।
स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांनी
आपुले प्राण पणास लावूनिया .....
