अब्दुल कलाम
अब्दुल कलाम
सरळ होते व्यक्तिमत्त्व त्यांचे, होते ते महान अन्
होता त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दैवत्वाचा साक्षातकार
असे हे आहेत व नेहमीच राहतील तरुणांचे एक थोर आदर्श अर्थातच 'अब्दुल कलाम '.....
होती त्यांच्यापाशी विलक्षण दूरदृष्टी,
वैचारिक उंची अन् होती चमक बुद्धीची
असे हे 'अग्निपंख' ठरले आहेत
आम्हांस 'प्रेरणादायी'......
तुमच्या राष्ट्रासाठीच्या अफाट योगदानाचे
आम्ही ऋणी राहू सदैव तुमचे
स्वप्नांवरती ठेवूनिया विश्वास
ठरू आम्ही पात्र तुमच्या स्वप्नास .....
बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यास
तुम्ही आमच्यात आत्मविश्वासाची उमीॆ चेतविली
स्वप्न साकार करण्यास .....
अशा मुकुटमणीच्या जाण्याने
आमच्या मनात जणू
पोकळीच झाली निर्माण .....
भारताच्या खाणीतला अब्दुल कलामांसारखा 'हिरा'
आज ठरले आहेत माझ्या मातृभूमीचे जणू 'हिरो' .....
