रविराजा
रविराजा
1 min
147
ऐन दुपारी राज असते रविराजाचे
नटतो जणू तो सुवर्ण किरणांनी
तेज जणू आहे त्याचे अगदी अपरंपार
डोळ्यांनाही सहन होत नाहीत किरणं ही ....
आमच्यावर एकच कृपा कर बरं का!
असाच तुझा प्रकाश आमच्या
नित्य वाटा करू दे मोकळ्या,
तुझ्या या निरंतर प्रकाशात आम्हांला
खुल्या करू दे वाटा मोकळ्या ....
तुला द्यावयाचं असल्यास
आम्हाला एकच दान दे,
सर्व पशू-पक्षी तुझ्या किरणांत
सुखा-समाधानाने नांदू दे .....
तुझ्या या सुवर्णकिरणांनी पोहचू नको दे हानी,
आणि तुझ्याबद्दल अजून काय सांगू!
"तू जणू राजसच आहेस"
