गूज अंतरीचे
गूज अंतरीचे
बोल अंतरीचे बोल तू
खोल मनीचे गूज तू
विसवल्या सांजेत का
रात्र भारवते विचार तू
कशी कुठे आरंभिले
कधी कोणी संपवीले
मन सांगसे झुरले का
तुझ्याच विचारात गुंगले
बोलता गूज अंतरीचे
नजरेत काहूर सलते
कळ तुझ्या मनीची का
माझ्या मनीचा ठाव घेते
माहीत असुनी गप्प का
नजरेत तुझ्या प्रश्न का
ओळखीच्या नात्यातील
खुण मनी पटली का
बोल तू गूज तुज मनीचे
सांगू काय नाते जनी ते
अबोला तुझा हा असा का
अंतरी खोल वादळ ऊठे
रात्र काहुरते मनी या
मनी आसुसते काया
आंधळी जाहली माया का
जीव आतुरलासे भेटाया
बोलता मी गूज अंतरीचे
उरेल काय नाते मनीचे
शाशंकीत होतसे मन का
समजावुनी सांग एकदाचे
थांबू की नकोशी जीवनी
खोळंबली रात्र आरंभुनी
नजरेत ठरली चूक कशी
नाती होती अजोड जुनी

